
जिल्हा प्रतिनिधी अमरावती : अमरावती पोलीस विभागातील पोलीस आयुक्त यांच्या नावाने फेसबुकवर अकाउंट तयार करून संबंधित लोकांना रिक्वेस्ट पाठवण्यात आलेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप ला फेसबुकला काही सर्वसामान्य माणूस आपापल्या पद्धतीने समाजाला जागृत करण्याचं काम करताना सुद्धा आपल्याला दिसत आहे.

परंतु साधारणता पोलीस कॉन्स्टेबल किंवा ठाणेदार एसपी नव्हे तर चक्क पोलीस आयुक्ताच्या नावाने फेक अकाउंट तयार करणे म्हणजे पोलीस विभागावरती किंवा त्यांच्या कामगिरी वरती प्रश्नचिन्ह निर्माण होने. इतकं सगळं होत असताना ज्या पोलीस विभागांतर्गत सायबर सेल हा महत्त्वाचा पार्ट येत असतो व त्यावरती पोलिसांचं लक्षही असते परंतु या ठिकाणी सायबर सेल कडे महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचे सुद्धा आपल्याला इथं स्पष्टपणे दिसून येते कारण तेव्हाच असे प्रकार घडतात.

अमरावती येथील पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या नावाने फेसबुक वरती एक नवीन बनावट अकाउंट बनवून नवीन चंद्र रेड्डी यांच्या नावाने त्यांच्या काही संबंधातील लोकांना पैसेही मागितल्याची धक्कादायक माहिती 2 मे 2025 शुक्रवार रोजी ही माहिती अमरावती येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने पत्रकार यांना देण्यात आली आहे.

अमरावती येथील सायबर पोलिसांनी बनावट फेसबुक अकाउंट पोलीस आयुक्ताच्या नावाने बनवणाऱ्याची ओळख पटविली असून तो राजस्थानचा असल्याचे अमरावती पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे
याप्रकरणी सायबर पोलिसांनी आयटीआय अन्वे बनवून फेसबुक अकाउंट बनवणाऱ्याच्या नावाने गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला आहे राजस्थानच्या या गुन्हेगाराने सीपीच्या नावाने बनावट अकाउंट बनवून अमरावती शहरातील काही लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट सुद्धा पाठविले असल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे.

इथे पोलीस सुरक्षित नाही तर सर्वसामान्य माणसाचं महाराष्ट्रातील पोलीस संरक्षण करणार काय!
