
संपादकीय : लाडकी बइन योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा निधी राज्य सरकारने वळविला आहे,

आदिवासी विभागाने 335 कोटी 70 लाख रुपये इतका निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वळता केला आहे अशी माहिती शासकीय यंत्रणेकडून – संगम समाचार ला मिळालेली आहे,

आदिवासी विभागाच्या एकूण 671 कोटी रुपयांच्या निधीवर महिला व बालकल्याण विभागाने डल्ला मारला आहे आदिवासी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जातो त्या आदिवासी महिलांच्या नावाने हा निधी महिला व बालकल्याण विभागाकडे राज्य सरकारने ओढता करण्यात आला असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे,

आदिवासी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो याविषयीची कोणतीही माहिती महिला व बालकल्याण विभागाने सादर केली नाही आणि ही आदिवासी महिलांसाठी वापरणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात किती आदिवासी महिलांपर्यंत पोहोचत आहे याची विचारणा वित्त विभागाने देखील केलेली नाहीत,

विशेष म्हणजे आदिवासी विभागाचा एकूण 671.40 कोटी इतका निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे हा निधी याच संवर्गातील महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार असल्याचा दावा सुद्धा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला आहे,

तरी किती आदिवासी महिला या योजनेचा लाभ घेत आहे हे मात्र राज्य सरकारने अजून सुद्धा स्पष्ट आकडेवारी देऊन केल नाही,

राज्य सरकार राज्यातील आदिवासी समाजाचे शोषण करतो काय समाजाला भरकटत आहे काय तसेच आदिवासींच्या विकासाकरिता मंजूर झालेला निधी हा वळता केल्याने आदिवासी समाजाचा खरंच पुढील काळात विकास होईल काय असे असंख्य प्रश्न निर्माण होत असून या सर्व प्रश्नावर सरकार उत्तर देतील काय हा सुद्धा एक प्रश्नच निर्माण झालेला आहे.
