यवतमाळ येथील BJP चे जिल्हाध्यक्ष यांच्या अंगावर गाडी चडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

संपादकीय : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आदित्य माने यांच्यावरती चार ते पाच जणांनी शाब्दिक वाद घालून अंगावर गाडी चढवून जीवे मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय,

आदित्य माने हे पेशाने वकील असून ते पुसद येथे आपल्या निवासस्थानापासून घरी असलेला पाळीव कुत्रा संध्याकाळी फिरायला घेऊन निघाले असता रस्त्याच्या कडेला एक ब्लॅक कलरची कार व दुसरीकडे बाईक अशी उभी असताना तिथे चार ते पाच जण उभे होते,

युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आदित्य माने यांची त्यांच्याशी बोलचाल व शाब्दिक वाद झाला त्यावेळी आदित्य मानेवरती एक व्यक्ती अंगावर चढून जाण्याचा प्रयत्न करीत असताना तिथेच उभे असलेल्या एकाने त्याला पकडल्याचही सीसी टीव्ही फोटेज मध्ये दिसते,

परंतु दुसरीकडे असलेला वेक्ती बाजूलाच असलेली ब्लॅक कलरची गाडी उघडतो गाडीत बसतो आणि काही समजायच्या आत आदित्य माने यांच्या अंगावरती गाडी चढवतो

तसेच आदित्य माने यांच्या हातात असलेल्या कुत्र्याला सोडून देतात स्वतःचा जीव वाचविन्या करिता पडतात परंतु ब्लॅक कलरच्या गाडीमध्ये बसलेला व्यक्ती त्याच गाडीला रिव्हर्स घेऊन त्याचा पाठलाग करतो व त्याला जीवाणीशी मारण्याचा प्रयत्न करतो,

परंतु आपला जीव कसा बसा वाचून आदित्य माने भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आदित्य माने तेथून पळ काढून जीव वाचवतात हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्या मध्ये कैद झालेला आहे,

पेशाने वकील असलेले आदित्य माने व भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकट वरती असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार दिसून येते,

महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडेच गृह खातं त्यांच्याच कार्यकर्त्यावरती पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरती असा जीव घेणा हमला होतो हे अत्यंत लाजिरवाणी आणि दुर्दैवी बाब आहे,

यावरूनच सर्व लक्षात येते का महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था हे गेल्या भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये बिघडलेली आहे व यवतमाळ ची गुन्हेगारी पाहता यवतमाळ येथील जिल्हा पोलीस प्रशासन हे मात्र झोपेचं सोंग घेताना सुद्धा आपल्याला दिसून येते,

असे खुलेआम राजरोसपणे जर हमले होत असेल तर त्या गरीब सर्वसामान्य माणसाचं काय हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय इतकं सगळं प्रकरण घडूनही कुठेही याची वाच्यता व उलघडा आतापर्यंत ही नाही याच नेमक कारण काय?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!